लक्ष्मि,लवकर लवकर,पुढे जा.  तो कोणाचा तरि देह वहात  आला आहे. तो बाहेर काढ.  हं,उचल तुझ्या सोंडेने,  हत्तिणिला मधुराणि सांगत होति.

हं,आतां अगदि हळुंच ठेव किनार्यावर,हळुं, हळुं. शाबास  !

लक्ष्मि तेवढंच करुन थांबलि नाहि.  तिने आपल्या अक्कलहुशारिने सोंडेत पाणि घेउन त्या वाहुन आलेल्या माणसाच्या तोंडावर मारले. बेशुध्द झालेला माणुस अशाने शुध्दिवर येतो हे बहुधा त्या हत्तिणिला कळत असावे.  पण तो माणुस बरेच पाणि प्यालेला असावा.

हे पाहुन मधुराणिने तें जड झालेले शरिर कष्टानेच उपडे केले, व पोटावर दाब देउन त्यातले पाणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या माणसाच्या तोंडाजवळ तोंड नेउन जोरांत फुंकर मारलि,व त्याचवेळि त्याचे हात खालिवर केले.  परिणामि त्याच्या छातिचि हालचाल झालि व त्याने मोठा श्वास घेतला.( to be contd.)

Advertisements