आल्हाददायक वारे जेव्हां सुखविति मना
गुढि उभारुनि नववर्षाचे स्वागत करु या वाटे जना,
कोकिळ अपुल्या मंजुळ स्रवरे जेव्हा बोलावितो तिला,
तेव्हां समजावे धरणिवरति ृऋतु वसंत अवतरला.

विचार करणे ठाउक नसते अम्हांसारखे पक्ष्यांना,
पण जाणिव कोठे तरि अंतरि सांगत असते त्यांना,
हिच वेळ खरि समागमाचि नातर होइल काय,
अंडि घालण्या उशिर होइल,घरटे उसने मिळेल काय

मिळेल तरि ते असेल काउचे,पाउस पडता वहाणार,
उघड्यावरति पडतां पिले आपुलि माउतोंडि जाणार.
हा दुरचा विचार जरि का आपणांस ना सुचणार,
निसर्ग देतो जरि न बुध्दि, नेणिव पक्ष्या रुपणार -कृष्णकुमार प्रधान

Advertisements