स्वामिंनि त्याला जवळबोलावले. चिनि माणसासारख्या दिसणार्या त्या माणसाला स्वामिंनि विचारले,    ह्यु एन् संग,हि तलवार तुझिचआहे नं ? सरळ, लांब पातें असलेलि ति तलवार त्याचिच होति.   लढतां लढतां तु पाण्यांत पडलास ना?  ते तुला आठवते,पण मागचा जन्म  तुला  आठवतो कां ?  त्या  समोरच्या डोंगराकडे निट बघ.  चांगने रोखुन बघितले .त्या बर्फाच्छादित पर्वतराजिच्या जागि त्याला हिरव्यागार झाडितिल देउळ, व आपल्याला वाचवणारि तिच मधुराणि,पण भरजरि वस्त्र नेसुन डौलात उभि असलेलि दिसलि.  ति तेव्हां म्हणत होति,तुला मि इथे आसरा दिला खरा,पण हि गोष्ट माझ्या प्रजेला आवडणार नाहि.  मला आतांच घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकु येतोय.कदाचित माझा सेनापतिच  संशयावरुन तुला पकडायला येइल, व तुला त्याच्याशि द्वंद्वयुध्द खेळावे लागेल.हे शिरस्त्राण तुझ्या डोक्यावर असुं दे.

चांगला एका सेकंदात  ते द्वंद्व आठवले. डोळ्याचि पापणि लवते न लवते तोंच स्वामिंचा  धिरगंभिर आवाज ऐकु येउ लागला.गौतम ,तैय्यार,चांग, आतां स्वतःला वांचव. प्रथम चांग धडपडला,कारण गौतमच्या दोन्हि हातांत तलवारि होत्या.व त्या फिरवित तो चांगवर चाल करुन येत होता.

एकाएकि चांगला मागचि कुठलितरि आठवण झालि.  शिलाजितबरोबर आपण असेच लढलो होतो.शिलाजितजवळ ढाल तलवार व  आपल्याजवळ भाला होता.त्या आठवणिनें त्याला एकदम स्फुरण चढले. आपलि लांब तलवार त्यानें आडवि धरलि व गौतमच्या दोन्हि तलवारिंचा हल्ला अडवला.नंतर इतक्या वेगाने हालचालि झाल्या कि नजर ठरणार नाहि अशि चकमक झालि. अखेर गौतमचि एक तलवार खालि पडलि व दुसरि जि उडालि ति चांगने वरच्यावर झेललि व गौतमवर आपलि तलवार रोखुन तो उभा राहिला.(to be contd.)

Advertisements