ब्रह्मदेवाचे एक मंदिरहिमालयाततअहे असे ऐकले आहे

शब्दां वाचून

शिव ही एक वेगळीच संकल्पना आहे.

तसं बघायचं तर ब्रह्मा हा या सृष्टीचा रचनाकार. खऱ्या अर्थाने देव. त्याने आपल्याला घडवलं. तो शिल्पकार आहे. पण असं असूनही बापड्याचं एकही मंदिर नाही. विष्णू संरक्षक, खऱ्या अर्थाने champion. राम, कृष्ण, परशुराम, वामन, अगदी गेला बाजार मत्स्य, कूर्म, वराह असे अवतार घेऊन त्याने आपल्याला मदत केलीये. राम, कृष्ण तर आजही आपल्या दैनंदिन आयुष्यात एक वेगळं स्थान ठेऊन आहेत. काही विशेष नाही की यांची अनेक मंदिरं असावीत.

पण शिव? एक बैरागी, वल्कलं नेसणारा, जटा वाढलेला देव. सौंदर्याची ह्याची एक वेगळीच व्याख्या आहे. आपल्या रंगात रंगलेल्या माणसाचं हे सौंदर्य. याचं एकूणच रूप वेगळं. गळ्याभोवती नाग, डोक्यावर जटा, त्यातून उगम पावणारी गंगा, कपाळावर तिसरा डोळा, रुद्राक्षाच्या माळा, अंगावर भस्म. याचं अस्त्र त्रिशूळ. ब्रह्मा, विष्णू आपल्याला हातात कमळ, शंख घेऊन बसलेले दिसतात. शिव मात्र डमरू घेऊन असतो. ताल, सूर ह्यांच्याशी ह्याचं काही वेगळा नातं आहे. हा तांडव करतो. असं नृत्य करायला लागणारी अफाट उर्जा फक्त ह्याच्यात आहे. हा…

View original post 323 more words

Advertisements