• मुरारबाजि करि कारंजि पुरंदरावर ह्रदयाचि
 • सुकलि कुठलि दौलत झालि धर्माच्या ध्वजराजाचि
 • संभाजिच्य़ा ह्रदयि खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणि
 • अमर त्याच्या छटा झळकति निधड्या छातिचि वाणि
 • खंडोजि कुरवंडि कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनि
 • स्वामिभक्तिचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनि
 • हे सिंहासन निष्ठेचे, हे नंदनवन देवाचे
 • मुर्तिमंत हा हरि नाचे   3
 •    स्मशानातल्या दिव्य महालि निजनाथासह पतिव्रता
 • सौभाग्याचि सिमा नुरलि उजळायाला या जगता
 • रमामाधवासवे पोचता गगनंतरि जळत्रय ज्योति
 • चिन्मंगल हि चिता झळकते या भगव्या झेंड्यावरति
 • नसुनि असणे,मरुनि जगणे राख होउनि पालवणे
 • जिवाभावाच्या जादुच्या या ध्वजराजाला हे लेणे
 • संसाराचा अंत इथे,मोहेचि क्षणि गांठ तुटे
 • धुके फिटे नवविश्व उठे   4
 • ह्या झेंड्याचे हे आवाहन महादेव हरहर बोला
 • उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणिचा घाला
 • विजकडाडुनि पडता तरुवर कंपित ह्रदयांतरि होति
 • टक्कर देता पत्थर फुटति डोंगर मातिला मिळति
 • झंझावातापोटि येउनि पान हलेना हाताने
 • कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
 • घनचक्कर या युद्धांत,व्हा राष्ट्राचे राउत
 • कर्तृत्वाचा द्या हात    5
Advertisements