कळि म्हणते वार्याला, असा माझा पदर खेचु नको
वारा सांगे कळिला, अशि बाळे लाजु नको
तुला तर फुलायला हवे, रंगाचे प्रदर्शन करायला हवे
भुंग्याचे पाय टोचुन घ्यायला हवे, परागकण एकमेकांत जुळवायला हवे.
नंतर मात्र गळुन जाइल रंगित पदर, आणि होइल तुझे फळांत रुपांतर.
पिकुन जेव्हा होइल पिवळे, मधुर गर वाढेल भोवति,
तेव्हां मात्र फळ खालि गळे,वाट पहाते खालि धरति.
जो जो जन्मला, तो तो गळाला, हातर नियम धरतिचा,
लागु होतो प्रत्येकाला,जो जो ह्या धरतिचा. -krishnakumar Pradhan
source: http://ourbhashabharati.blogspot.com

Advertisements