Documents आला श्रावण आला श्रावण
कविमनांना आले उधाण
जो उठतो तो घेउनि लेखणि
पाहि गवाक्षातुनि धरा देखणि 1
प्रसन्न मनातुनि शब्दहि स्फुरति
वर्णाया तिज परि न पुरति
कैसे करु मि कविता लेखन
घेउनि शब्द जे नसति पुरातन 2
श्रावण परि हाँ मनि घुमावा
नव्या तुषारे निसर्ग फुलावा
कमलपत्रि जरि नाहि उमटला
आंतमध्येच जरि घुसमटला
अनुभव त्या चा कायम व्हावा
घर करुनि या जिवनि वसावा 3
बालपणिच्या इवल्या बोटि
वाहुनि नेते नदी वसिष्ठि


बालपणिचा सुगंध सुंदर
मनांत माझ्या राहि निरंतर 4
नंतर होति हिरवे डोंगर
कुशिकुशितुनि दुधाळ निर्झर
वारयावरति डुलति शेते
त्यासह धरणि झोके घेते 5
करवंदिच्या जाळितुनि परि
इवला सर्पहि फणा काढि
दचकुनि मि मागे जाइ
पाय घसरुनि तोलहि जाइ
कामि टाकुनि परि धांवत येइ
मला सांवरि गरिबाचा पोर 6
क्षणांत जुळति मनि यिथि
रंक आणि राव हा भेद मिटे

Advertisements