वर्षाला उद्देशुन

आज सखे पासष्टिचा वाढदिन तव आला

उदेपुरि राहिलिस तु रजपुतांच्या जलमहाला

सुकद अशा केसरिचि साथ असे तुजला

बालमैत्रिणिंचि संगतहि

सतत मिळे तुला

परततांना बघुन येइ

जैनांचे धलवारा

अंगावर घेताना

परतणारा पाउसवारा

वाट पाहि घर सारे

मिहि किंचित दिनवाणा    21-9-2001

Advertisements