भुलोकिच्या अंकि निजलो

पावसातहि कधि भिजलो

आम्हि भुमातेचि लेकरे

आम्हा पाहुनि तुम्हा फेपरे  1

क्वचितकाळि दयाबुध्दिने

किंवा पुण्य मिळविण्याच्या इच्छेने

शिळेपाके जरि असेल थोडे

तरि अन्नाचे घास गोड हे

देता आम्हां म्हणता वरति

कशास आलि पिडा नसति    2

वस्त्रे जिर्ण झालेलि ति

तुम्हां कधि जि नाहि घालायचि

गांठोडि करुनि अमुच्या माथि

मारुनि स्वत:ला उदार म्हणवितां   3

नको जिवन हे लाजिरवाणे

दोष नसता  परधार्जिणे

प्रलय किंवा अग्नितांडव

येइल तेव्हां सर्व सारखे

 

Advertisements