बहुत वाहिला बा पावसा, आवर तुझि हि धार

पावसा तुच जिवा आधार -ध्रु

क्रुष्णा कोयना गोदावरि बुडविति घरे नि शेति पार

ऐका ऐका क्रुषिमंंत्रि,अन्नमंत्रि,सरकार

विठ्ठलमुर्ति स्नान करि जरि पंढरपुरि

पाण्याला ना अंत ना पार

पावसा तुंच जिवा आधार 1

एके काळि कोण तो वसंत दुरदर्शि

करि योजना नद्यानद्यांना जोडुन देण्याचि

भेट घेउनि लाल बहादुर शास्त्रिजिंचि

अखेर कोठे एकविसाव्या सतका आरंभि

वाळवंटिच्या जने चाखले नदिचे पाणि

परि आजहि इथे वा तिथे विदर्भि

शेतकर्याचि द्रष्टि वळते नभि

मोसमि वारे येतांना पाहुनि करितो तोच पुकार

पावसा तुच जिवा आधार

Advertisements