फुलव पिसारा मोरा,श्रावण आला
सहजच खुलतोस तुझा तु,तुजला नकोच सांगायाला
आषाढातच मेघ गर्जति, घोंगावत वारा,
पाहुनि त्यांना मनांत तुझिया,
ताल वाजतो कुठला
कुरुप पाय ते म्हणति ज्यांनि
नाच न तुझा पाहिला
धुंद होउनि थरथरताना,
तुझि रंगित काया,
पिसे धुंद होउनि नाचति,
विस्फारुनि शतशत नयनांना
मानवाचि त्या नजर विषारि
पडो न तुजवरति .
झाडाझाडांमधुनि पाहति
लाजत लांडोरि
त्यांना का आवतन देशि,फुलवुनि पिसारा,
लौकर या ना,साकारु या अपुला संसार पसारा.
येता एकादशि,चहुबाजुनि,
गजर येइल विठ्ठल विठ्ठल हरि,
टाळ म्रुदंग वाजवित ते येतिल वारकरि,
होतां जयघोष तयांचा प्रसन्न होइल हरि
तहानलेल्या शेतावरति, येतिल सरिवर सरि.
लपुन बसशिल तेव्हा कोठे जरि
तर पुन्हा एकदा कवि देइल ललकारि,
फुलव सिसारा मोरा, जा श्रावणांस सामोरा

Advertisements