आमचि भुमाता आमच्यावर रागावलि

आम्हिच पेरलेलि बाजरि आम्हास ना गावलि

दाणं न्हायि गावलं,झाडपाल्यावर राहु

देवाजिच्या क्रिपेचि आम्हि वाट पाहु

आमचं एक राह्यलं, पर पोराबाळांचं काय

त्यांचं वाढतं अंग,दाण्याबिगर त्यांना राहवायचं नाय

पाणि आमायला,लाब,डोंगर उतरुन जाववायचं नाय.

पोटं रिकामि,तोंडं बि कोरडि,असं फार दिस चालायचं नाय,

केलिच पयजेल कायतरि त्यांच्या पोटाचि सोय.

पर एक दिस मातर ,शहरातला अण्णा आला,

शेति नाय तर नाय,कायि उद्योग काढायला लागला.

वेताच्या टोपल्या अन् विणलेल्या चटाया,

आठवड्याच्या बाजारात नेउन इकाया

तोडावि पानं अन् कराव्या पत्रावळि

करावे द्रोण सुबक आकार देउनि

तेवढं विकुन आजचि गरज भागलि

पण येणार्या दिसांवर नजर रोखलि

डोंगराच्या भंवति चर खणुन काढले

पावसाचं पाणि रोखण्यास नामि उपाय केले

उद्याचं सपान सुखाचं दिसाया लागलं

म्हणा रे म्हणा,सख्या हरि रंगा,

आलि रे आमच्रया गांवि विकासगंगाDSC_0039

Advertisements