अष्टा्क्षरी-नवकविची ही व्यथा
अशी कशी छंदोमयी
 करणार मी कविता 
धडपड चालू राही
जोवरी चंद्र सविता.
अक्षरे मोजकी हवी 
एक ना जास्त वा कमी 
शब्द उलटेपालटे
कसेही करणे चाले.
सीमित अक्षरा भावे
असे शब्द निवडावे
अर्थास त्यातुनी घ्यावे
कसेतरी समजोनी.
भाव मुके ती कविता
नैसर्गिकता नुरता
लागते असे बोलाया
कविंनो,तुम्ही का वीता?–krishnaku

Advertisements